डाॅ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या आदेशाला केराची टोपली ?

महत्वाची बातमी
Share

डाॅ.बापूसाहेब नागरगोजे आपल्या अधिनस्त कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करतील का सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी आधारलिंक बायोमेट्रीक प्रणाली वरील उपस्थिती बाबत केली असता.जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगर यांनी आदेश काढले होते माञ जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व कार्यालये यांस याआधी अनेकदा आधारलिंक बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी नोंदवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व परिमंडळे / आरोग्य संस्था/कार्यालये याठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा /मशिन बसविण्यात आलेल्या आहेत

सदर संबंधित बायोमेट्रिक पोर्टलचे परीक्षण केले असता निदर्शनास आले आहे की,अहमदनगर जिल्हयामध्ये आजही बायोमेट्रीक प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित झालेली दिसून येत नाही.क्षेत्रिय,जिल्हा,तालुका, ग्रामीण,स्तरावर बायोमेट्रीक प्रणालीची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे हि आपली जबाबदारी आहे.सदर प्रकरणी वारंवार कळवूनही आपल्या अखत्यारीत असलेले अनेक अधिकारी/कर्मचारी आजही बायोमेट्रीक हजेरी नोंदवित नाहीत ही बाब अत्यंतखेदजनक आहे.आजही अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक मशिन सुरु झालेल्या नसून,अनेक संस्थांमध्ये बायोमेट्रीक मशिन दीर्घकाळापासून नादुरुस्त असल्याचे निदर्शनास येत आहे.बायोमेट्रीक मशिन चालू स्थितीमध्ये (Active) ठेवणे ही संबंधित कार्यालयप्रमुखांची जबाबदारी आहे

संबंधित प्रकरणी आपणांस आदेशीत करावेत की आपण सदर विषयात तातडीने लक्ष घालून आपल्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या १०० % अधिकारी / कर्मचारी यांना बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी नोंदविण्या बाबत व मानधन बायोमेट्रीक उपस्थिती नुसार अदा करणेबाबत आपले स्तरावरुन योग्य ते निर्देश देण्यात यावेत.तसेच कार्यालयात वापरात असलेल्या बायोमेट्रिक मशीन कार्यान्वीत असल्याचे खातरजमा करून वेळोवेळी त्याबाबत दैनंदिन आढावा घेण्यात यावा आणि बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित नसलेल्या कार्यालय प्रमुखांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.खरच जिल्हा आरोग्य अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचारी याच्यावर कार्यवाही करतील का असा प्रश्न सामाजिक कार्यकते दिपक पाचपुते यांना पडला असावा यात तिळमाञ शंका नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत