महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक कार्यालयात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र मुख्यपान
Share

महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक कार्यालयात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन अत्यंत आदर आणि गांभीर्याने साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

उपस्थितांनी संवैधानिक मूल्यांप्रती निष्ठा पूनर्स्थापित करत संविधानाची प्रस्तावना हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सामूहिकरित्या वाचली. उपस्थितांनी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मार्गदर्शक तत्त्वांप्रती आपला विश्वास दृढ केला.

संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, संविधानाच्या निर्मितीत मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी कवी इक्बाल यांचे एक वचन उद्ध्त केले:

“काही लोक काळाच्या साच्यात स्वतःला घडवतात आणि काही लोक काळाचे साचेच बदलून टाकतात.”

डॉ. आंबेडकर हे दुसऱ्या प्रकारातील काळाचे साचे बदलणाऱ्या व्यक्तींमध्ये मोडतात हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच संविधानात अंतर्भूत केलेली मूल्ये केवळ व्यावसायिक जीवनातच नव्हे तर वैयक्तिक जीवनातहीआचरणात आणली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमातील सर्व उपस्थित त्यांनी संविधानातील आदर्शांचे दैनंदिन जीवनात पालन करण्याची प्रतिज्ञा केली, तसेच लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक नैतिकतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

कार्यक्रमाचा समारोप संयुक्त सीसीएचे शशांक भारद्वाज यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत