मतदार यादीत ४५० दुबार मतदार असल्याची केली तक्रार.
एरंडोल प्रतिनिधी. एरंडोल येथील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुमारे ४५० मतदार दुबार असल्याची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकूर,प्रभागातील भाजपचे उमेदवार संजय सुरेश पाटील,मालती अमोल वाणी,मंजुळाबाई नथ्थू चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदिप पाटील यांना तक्रार दिली आहे.
तक्रारीत प्रभाग क्रमांक ११ मधील सुमारे ४५० मतदार दुबार असल्याचे आढळून आले. अशा मतदारांना मतदानाचा एकाच वेळी हक्क दिला जावा किंवा त्यांना मतदान करण्यासाठी रोखण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी केलेली असुन या दुबार मतदारांमध्ये काही शासकीय कर्मचारी देखील असल्याचे म्हटले आहे.सदर तक्रारीत, मतदार निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळफेक करून मतदानाचा गैरवापर करीत असल्याचे देखील म्हटले आहे.शेवटी आम्हाला तक्रार देण्यास विलंब झाल्याबद्दल देखील तक्रारदारांनी माफी मागलेली असून लोकशाहीत मतदानाचा योग्य प्रकारे अधिकार बजावण्यासाठी आपल्या मार्फत काटेकोर व कडक शिस्तीचे पालन होण्याची विनंती केली आहे.तसेच सदर कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात देखील जाऊ असे म्हटले आहे.तक्रारी सोबत मतदार यादीतील दुबार मतदारांच्या नावासमोर मार्किंग केली असून दुबार मतदारांची ऑनलाइन पडताळणी केल्याबाबत पुरावा उदाहरणा दाखल जोडण्यात आला आहे.निवेदनावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकूर,प्रभागातील भाजपचे उमेदवार संजय सुरेश पाटील,मालती अमोल वाणी,मंजुळाबाई नथ्थू चौधरी यांच्या सह्या आहेत.

