डी.डी.एस.पी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही एड्स व नशा मुक्ती बाबत जनजागृती

E-Paper महाराष्ट्र सामाजिक
Share

एरंडोल – येथील
राष्ट्रीय सेवा योजना अंर्तगत दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे रेड रिबन क्लब उद्घघाटनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अमित पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रेड रिबन क्लब चे उद्घाटक करण्यात आले.नेहा पाटील,राजश्री पाटील व नेहा महाजन यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथील दंत शैल्यचिकित्सक डॉ. प्रफुल्ल पाटील, समुपदेशक अंकुश थोरात,वीरेंद्र बिऱ्हाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
दंत शैल्य चिकित्सक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी तंबाखू, गुटखा, पान मसाला व इतर व्यसनकारक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी नशा मुक्तीची शपथ दिली.समुपदेशक अंकुश थोरात यांनी विद्यार्थ्यांचे एच.आय. व्ही.बद्दल समज गैर समज दूर केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश येंडाईत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. मीना काळे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर विसपुते यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापक कर्मचारी यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत