कविवर्य सुरेश भट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लाभार्थीच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग, अंध, कर्णबधीरांना जयपूर फूटसह आवश्यक सहायक साहित्य देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मनपाच्या सहकार्याने आज (ता. 7) कविवर्य सुरेश भट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लाभार्थीच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, नागपूर जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व टाटा ट्रस्टने संयुक्तपणे हे शिबीर आयोजित केले आहे. जयपूर फूट तयार करण्याच्या मशीनचे पूजन अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. यांनी केले. यावेळी भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री. नारायण व्यास, समन्वयक श्री. सुबोध भंडारी उपस्थित होते. या शिबीरातील व्यवस्थेची पाहणी मुख्यमंत्री सचिवालय येथील सहसचिव श्रीमती आशा पठाण यांनी केली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर व श्री. अभिजीत राऊत उपस्थित होते. मनपाद्वारे शिबिरात येणाऱ्या दिव्यांग बांधवाना उत्तम सोयीसुविधा प्रदान केल्या जात आहेत. यावेळी एनसीसी, व एनएसएसचे स्वयंसेवक नागरिकांना सहकार्य करीत आहे.

