प्रा. उमेश सूर्यवंशी यांना उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांक

E-Paper महाराष्ट्र सामाजिक
Share

एरंडोल – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील प्रा. उमेश सूर्यवंशी यांनी चाळीसगाव येथील बी.पी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आयोजित ‘National Conference on Frontiers in Entomology – 2026’ या राष्ट्रीय परिषदेतील उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रा. उमेश सूर्यवंशी यांना ट्रॉफी, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग पराग मनसाराम यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य व उपस्थित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. उमेश सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
संशोधन क्षेत्रातील त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या संशोधन कार्याला भविष्यातही अशीच यशाची भरारी मिळावी, यासाठी महाविद्यालय परिवाराच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत