डोंबिवलीमध्ये खाडी किनारीलगत हरित पट्ट्यावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार का कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त

मुख्यपान
Share

विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये सर्रास अनधिकृत बांधकामे होत आहेत . तेही नगररचना विभागाच्या अधिकारी यांना हाताशी धरून बिल्डर लॉबी ने शाळेच्या आरक्षित भूखंडावर तसेच बगीच्यासाठी राखीव भूखंडावर भूमाफियांनी डल्ला मारला आहे व सात मजली इमारत बांधल्याचे डोंबिवली मधील एका सामाजिक कार्यकर्ते भोईर यांनी निदर्शनास आणून दिली आहे तरी ही कारवाई नाही .कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या अधिकारी यांच्याशी आर्थिक व्यवहार करत २९० च्या आरक्षित भूखंडावर सात मजली इमारत उभी झाली आहे. नगररचना विभागाच्या अधिकारी यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे सादर करून परवानगी मिळवली आहे .तसेच डोंबिवलीमधील खाडी कीणारी लगत हरित पट्ट्यात अनेक इमारती चे संकुल उभारण्यात आले आहे . महानगरपालिका ने दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त मजले बांधण्याचा सपाटाच लावला आहे बिल्डर यांनी. याप्रकरणी कित्येक तक्रारी समोर आल्या आहेत. डोंबिवली मध्ये हरित पट्ट्यात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या निदर्शनास काही समाजसेवक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी अनधिकृत बांधकाम निदर्शनास आणून दिले असले तरी कारवाई शून्य करण्यात आली. या सर्व अनधिकृत बांधकामावर एका बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आयुक्तांचे हात कारवाई साठी पुढे सरसावत नाही आहेत . कारवाई करण्याकरिता फक्त कारवाई करण्याचा बडगा उगारला असे चित्र निर्माण केलं जाते. महानगरपालिका यांनी पोलीस खात्याला पोलीस संरक्षण मागितले की पोलीस खाते सांगते की कारवाई ची जागा निश्चित आणि वेळ नसल्याने आम्ही बंदोबस्त देऊ शकत नाही , कारवाई ची जागा आनि वेळ निश्चित चे पत्र द्या . नंतर आम्ही बंदोबस्त देतो . या भूमिकाबाबत दोन्ही खात्याची कारवाई संशयास्पद रित्या दिसून येत आहे .तुम्हीं मारल्यासारखे करा मी रडल्या सारखे करते अशी गत महानगरपालिका आणि पोलीस खात्याची झाली आहे . यातून एकच स्पस्ट होते की अनधिकृत बांधकामे वाचवण्याचे कार्य सुरू आहे . याप्रकर्णी एक सामाजिक कार्यकर्ता विनोद जोशी आझाद मैदानात गेली दहा दिवस उपोषण करत होता. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते कल्पेश जोशी यांनी ही वारंवार तक्रारी केल्या आहेत . मागील आयुक्त भाऊसाहेब दांगडे हे अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आले होते म्हणूनच माहिती अधिकार कार्यकर्ता ( फेडरेशन )महासंघ चे कल्याण शहर प्रचार प्रमुख विनोद काळकोपरे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन यांच्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त दांगडे यांची बदली करून त्याजागी तुकाराम मुंढे यांची मागणी लावून धरली होती . परंतु आता महानगरपालिका वर नव्याने आलेले आयुक्त डॉ इंदूराणी जाखड हे ह्या अनधिकृत बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करत सर्व इमारती निष्काशीत करून नगररचना विभागातील भ्रष्टाचार करून बनावट कागदपत्रे हाताळणाऱ्या व बिल्डर यांना आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी देणाऱ्या सर्व अधिकारी यांच्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त कारवाई करणार का ह्या सगळ्या प्रकरणात कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १९९५ साली अग्यार समिती उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत करन्यात आली होती. सत्तर हजार च्या जवळपास अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले होते . यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर व कौस्तुभ गोखले यांनी एका याचिकेमार्फत उच्च न्यायालयाच्या किमान दीड लाख अनधिकृत बांधकामे झाल्याचे निदर्शनास आनुन दिले होते . अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे हा गुगल मॅपिंग द्वारे सर्व्हे करण्यात आला होता . याला अंदाजे तीन कोटी च्या घरात खर्च आला होता .कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील झालेले अनधिकृत बांधकामे आणि कार्यालयात पोसलेले भ्रष्टाचाराचे कुंभकर्ण अधिकारी यांच्यावर नव्याने आलेले आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी राजकीय दबावाला बळी न पडता महापालिकेतील भ्रष्टाचार कमी करावा व भ्रष्टाचारी अधिकारी यांना वेळीच लगाम घालावं

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत