TIMES OF ORANGE CITY

लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी आयोजित करण्यात आलेल्या कठिनोध्दार चीवर दान समारंभात विविध देशांतील बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते.    भगवान बुद्धांच्या ज्ञानाची पवित्र भूमी असलेल्या लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे रविवारी कठिनोध्दार चीवर दान  समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमात अनेक देशांतील बौद्ध भिक्खू आणि भाविक सहभागी झाले होते. या समारंभात बौद्ध भिक्खूंनी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना केली.

महाराष्ट्र
Share

 

(टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृत्संकलन)

चंद्रपुर (चिमुर) : भगवान बुद्धांच्या ज्ञानाची पवित्र भूमी असलेल्या लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे शनिवार व रविवारी कठिनोध्दार चीवर दान  समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कठीण चीवर दानाची सर्व तयारी पूर्ण केलि होती. लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे  गेल्या अनेक वर्षापासूनच वर्षावास पूजा सुरू झाली आहे. अशा स्थितीत यानिमित्ताने शनिवार आणि रविवारी कठिन चीवर दान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .भगवान बुद्धांच्या काळापासून कठिन चीवर दान करण्याची परंपरा चालत आलेली आहे .पावसाळ्याच्या दिवसात बौद्ध भिक्खू येथे आश्रय घेतात. पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहून साधना करतात. अनेक  वर्षांपासून भाविकांकडून भिक्षूंना चीवर दान केली जातात. बौद्ध भिक्खूंच्या पोशाखांना चिवर म्हणतात. वर्षावासाच्या कठोर सरावानंतर, भाविक बौद्ध भिक्खूंना दैनंदिन वापराच्या इतर वस्तू देखील दान करतात. ही परंपरा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र मधे चंद्रपुर जिल्हा लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथे उपस्थित बौद्ध भिक्खूंनी व पूज्य भदंत ज्ञानज्योति महाथेरो संघारामगिरी (ताडोबा-अभयारण्य) स्थळ : लैदी सयाडो विपश्यना केंद्र, गुजगव्हान जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थनाही केली. यासाठीही उपासक उपसकेनी भगवान बुद्धांची प्रार्थना केली आहे.

चिवरदानात सहभागी होण्यासाठी जगातील अनेक देशांतून बौद्ध भाविकही येथे आले आहेत. बौद्ध परंपरेनुसार विशेषज्यांनी येथे सहभाग घेतला आहे. बौद्ध परंपरेनुसार, विशेष प्रार्थनेदरम्यान बौद्ध भिक्षूंना चीवर दान केले गेले. लैदी सयाडो विपशना केंद्र येथील विविध देशांतील भन्ते बोलाउन दरवर्षी या परंपरेचे आयोजन केले जावे. असेही जिल्हापरिषद माजी अधक्ष सतीश वारजुरकर यानी वक्तव्य केले. प्रमुख पावने म्हणून बांग्लादेश चे प्रख्यात गाजलेले ब्यारिस्टर राजशेष रॉय (चकमा राजा) उपस्थित होते.

परमपूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघ) परमपूज्य भदंत सौरजगत महाथेरो (बांग्लादेश),भदंत बोधीमीत्रा महाथेरो (बांग्लादेश),भदंत समन थेरो (थायलँड),भदंत ग्याणसमित्रा थेरो (बांग्लादेश),भदंत ज्ञानज्योती महाथेरो (बांग्लादेश),परमपूज्य भदंत शिलानंद,महाथेरो (तपोभूमि आंबोडा, वर्धा),भदंत विमलानंद महाथेरो (बांग्लादेश), भदंत मुदीता कीर्ती महाथेरो (बांग्लादेश), भदंत धर्माजीत थेरो (बांग्लादेश), भदंत कौण्डिण्य थेरो (त्रिपुरा), भदंत महामित्रा महाथेरो (बांग्लादेश), भदंत हेबसेन थेरो (बांग्लादेश), भदंत सानुकीर्ती थेरो (बांग्लादेश), भदंत ज्ञानबोधी (मिजोरम), परमपूज्य वंदनीय महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघयांच्यासह अनेकजण उपस्थित होते. लैदी सयाडो विपशना केंद्र येथे विविध देशांतील बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते. सोबतच बुद्ध उपासक, उपासिका,गायक, गायिका शेकडोच्या संकेत उपस्तितित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत