आरक्षणाचे लाभार्थी आणि त्यांच्या भूमिका संविधानाच्या मुळावर!..

संपादकीय
Share

आरक्षणाचे लाभार्थी आणि त्यांच्या भूमिका संविधानाच्या मुळावर!..

नागपूर :- जगामधे अनेक महापुरुषानी सामाजिक क्रांत्या केलेल्या आहेत. दक्षिण अफ्रीकेमधील नेल्सन मंडेला यांनी वर्ण वेवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करुन सामाजिक क्रांति केली.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती वेवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करुन सामाजिक क्रांति केली. नेल्सन मंडेला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिला जगामधे तोड नाही. अधिक प्रकर्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतिकडे पाहिले जाते. त्याच कारण ही महत्वाचे आहे. शिक्षण, राजकारण, सत्ता, संपती अशा सर्वच बाबतीत गुलाम असनारा समाज एका वेक्तिच्या हाकेवर गुलामीची बंधने झुगारुन देऊन पुढे येऊन स्वताला सर्वार्थाने पुढे घेऊन येतो ही सामाजिक क्रांति जगामधे कुठे ही घडली असेल हे दुर्मीळच आहे.सातत्याने भारतावर अनेक परकीय आक्रमणकारी स्वाऱ्या झालेल्या आहेत. त्यामधे डच,पोरतुगीज, मोंगल, मुस्लिम, ब्रिटिश व ब्राह्मण (आर्य )वरील सर्व आक्रमणकारी लोक हे सत्ता संपतीसाठी आले होते. सत्ता संपती याचा लाभ घेऊन ते निघून गेले. पण या मधील ब्राह्मण(आर्य) समाज हा परत गेला नाही. तो भारतातील सर्व समाजाला देव व धर्म वेवस्थेच्या माधेमातून मानसिक गुलाम करुन क़ायम लाभ उठवत आला आहे.पण बाबासाहेब आंबेडकर त्यांना पुरुन उरले आहेत. याचाच बदला म्हणून येतील संविधानीक वेवस्था संपवनेचे शडयंत्र घेऊन ते क़ायम काम करत असतात आणि त्याला आरक्षणाचे लाभार्थी बळी पडले आहेत. संविधानीक हक्क अधिकाराची अमलबजावनी झाले नंतर दलित, ओबीसी, भटके, आदिवासी असे सर्वच शिक्षण, आरक्षण, प्रमोशन या प्रवाहात आले . पण संविधानीक सुरक्षा व संवर्धन या बाबतीत कूचकामी ठरले आहेत.आपला वैयक्तित स्वार्थ डोळ्या समोर ठेवून गद्दार निघाले आहेत. आपल्या आख्या कुटुंबाचे सुख, समाधान, आरोग्य, स्वास्थ्ये अशा कोणत्याही गोष्ठीला महत्व न देता फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी आपल्या बायका पोर यांच्या जीवाची पर्वा न करता, आपल्या जीवाची बाजी लावून अखंड भारतातील उद्योगपती, भांडवलदार, राजनेता यांच्याशी संघर्ष करुन बाबासाहेब यांनी मिळवलेल्या हक्क अधिकार पायदळी तुडवुन संविधान संपवाय निघालेले आरक्षणाचे लाभार्थी स्वताला आजुन प्रमाणिक , निष्ठावान, मानत आहेत. अशानी स्वताचे आत्मपरिक्षण करावे.आरक्षणाचा लाभ घेऊ नोकरी करनारा शासकीय,नीमशासकीय, वर्ग हा उच्चअधिकारी, संस्थापक व राजकीय वेवस्थेचा गुलाम झाला आहे.खाजगी संस्थेमधे टिचिंग नॉन टिचिंग वर्गात काम करनारा हा आंबेडकर चळवळीचा नाही तर संस्थापक याचा अधिक गुलाम म्हणून काम करत असतो.त्याला असे वाटत असते की माझ्या नेत्यान, संस्थापकान मला नोकरी दिली आहे. त्याच्यामुळे मी सन्मानाने जगत आहे. तो कोणत्याही पक्षाचा समर्थक असो. अगदी भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कोणत्याही. ते सांगतील त्यांना मते देऊन सत्तेमधे बसवायचे अगदी तो जात धर्म पाळत असला तरी. संविधान विरोधी असला तरी त्यालाच मतदान दयायचे. ह्या सर्व महाभागाना गद्दार म्हणायचे की नालायक हे आता ठरवायची वेळ आली आहे.(प्रामाणिक आहेत त्यांना सलाम.)
देशामधे गेल्या पंच्याहत्तर वर्षामधे साठ वर्ष कॉंग्रेस सत्तेमधे होती तर पंधरा वर्ष भाजपा. यांना सत्तेमधे बसवत असताना आरक्षण लाभार्थी यांनी घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, त्याग, समर्पण याचा विचार केला होता का? काय फक्त आपन, आपले कुटुंब, आपले आयुष याच्यात मग्न होते. स्वार्थ मानवाला आत्मनाशाकडे नेतो. आज तुम्ही स्वतंत्र आहात. उद्या तुमच्या शिक्षित पिढ़या गुलाम होणार आहेत. किमान मरनाच्या शेवटच्या क्षणी आपले पूर्वज कोण होते? आपन कोण आहोत? आणि आपल्या पुढील पिढ़या काय असतील याचा विचार करुन मरा. मग मरण सोपे आहे की अवघड हे आपल्याला मरण समयी कळेल.
ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर चळवळ संपवली त्या लोकांन बरोबर तुम्ही. ज्या लोकांनी समाज गुलाम केला त्यांच्या बरोबर तुम्ही.ज्या पक्षानी समाजावर अन्याय अत्याचार केले त्यांच्या बरोबर तुम्ही.ज्या राजकीय नेत्यांने संविधानाला विरोध केला त्यांच्या बरोबर तुम्ही.ज्या समाज वेवस्थेने बाबासाहेब यांना प्रचंड त्रास दिला त्यांच्या बरोबर तुम्ही. आंबेडकरी पक्ष संघटना तुम्हाला भिकारी वाटतात व जातीयवादी पक्ष नेता चांगले वाटतात याचा वेळ जाने अगोदर विचार करा. नाही तर गद्दारांचा इतिहास ही लिहिता येतो. नानकचंद रतू बाबासाहेब यांची शेवटची आठवन सांगताना म्हणतात. एके रात्री बाबासाहेब अस्वस्थ पने आपल्या खोलित होते. त्यांचा कंठ दाठून आला होता. त्यांच्या मनाची घालमेल प्रचंड चालली होती. कस विचारु, मला काय म्हणतील, मला रागवतील, अशा भिती पोटी नानकचंद रतू बाहेर थांबले होते. शेवटी बाबासाहेब ओकसा भोकशी रडू लागले. आणि रतू यांनी कोणतीही तमा न बाळगता बाबासाहेब काय झाल. इतके दुःखी का झालात. बाबासाहेब म्हणतात मी माझे सर्वस्वी पनाला लावून हा सर्व गाड़ा निर्माण केला आहे. पुढे जावून आपले लोक हे सुरक्षित ठेवतील या बाबत मला शंका आहे. माझ्या नंतर माझ्या समाजाचे हाल काय होतील ह्या भितीने माझ्या मनाची घालमेल होत आहे. पहाढा सारख आयुष जगलेली महापुरुषाच्या मनाला वेदना देणारे गद्दार काल ही होते. आज ही आहेत.चालले संविधान दिन साजरा कराय. एक दिवस दिला की झाले नामा निराळे. आजुन ही वेळ गेलेली नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत