संशोधन, स्पर्धा परीक्षेसाठी मदत करणार ई-रिसोर्स

पदव्युत्तर विधी विभागात संगणक प्रयोगशाळा उद्घाटित -संगणक लॅब प्रत्येक विभागाची गरज - कुलगुरू

महत्वाची बातमी
Share

संशोधन, स्पर्धा परीक्षेसाठी मदत करणार ई-रिसोर्स

-पदव्युत्तर विधी विभागात संगणक प्रयोगशाळा उद्घाटित

-संगणक लॅब प्रत्येक विभागाची गरज – कुलगुरू

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले. संशोधन, स्पर्धा परीक्षा तयारी त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज घडामोडीची माहिती मिळविण्यासाठी ई-रिसोर्स मदत करणार आहे. अशी संगणक लॅब प्रत्येक विभागाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी उद्घाटन करताना केले.
पदव्युत्तर विधी विभागात पार पडलेल्या कार्यक्रमाला आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संगणक लॅबचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी कोणतीही कायदेविषयक माहिती घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांना इंटरनेटची मदत घ्यावी लागते. प्रत्येक क्षेत्रात संगणक महत्त्वपूर्ण झाले असून मागील १५ वर्षात त्याची गरज वाढली आहे. विद्यापीठ म्हणून विविध सरकारी संस्था ऑनलाईन परीक्षा घेण्याकरिता संगणक लॅब बाबत विचारणा करतात. या दृष्टीने सुसज्ज अशी भव्य संगणक लॅब तयार करण्याची विचाराधीन असल्याचे कुलगुरू म्हणाले. विधी महाविद्यालयाच्या मागील भागात पदव्युत्तर विभाग सुरू करण्याच्या हालचाली आहेत. त्याचा आराखडा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. विभागाकडून सुरू करण्यात आलेली संगणक लॅब विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच अन्य न्यायालयातील निकालाबाबत अपडेट करेल. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना येथे सुविधा मिळणार आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सहकार्य होणार असून सुविधा मिळणार असल्याचे कुलगुरू म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे यांनी सुसज्ज अशी डिजिटल संगणक लॅब सुरू होत असल्याने आनंद व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर यांनी विभागाला भेट दिल्यानंतर लॅबची गरज व्यक्त केली होती. पाठपुरावा केल्यानंतर कुलगुरूंनी तातडीने लॅब मंजूर केली

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत