*🔹 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- पोस्ट नं.१४४.*🔹
◾ सदाचरणावरील प्रवचने ◾
*🔹१. सदाचरण म्हणजे काय?*🔹
•एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले.
• ही वार्ता झाला मधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली.
• त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून झाला ग्रामचे भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले.
• त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.
• त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, “शारीरिक दुराचारणाचे आणि दुष्टपणाचे तीन प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे चार आणि तीन प्रकार आहेत.”
• शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रकारे:
° यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो.
° दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचारणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो.
° तिसऱ्या प्रकारच्या दुराचारणात माता-पिता, बंधू-भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाड:निश्चय होऊन वाड:निश्चयच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्याभिचार करणे यांचा समावेश होतो.
*🔹( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पान नं.२९३.)*🔹
*🔹 संकलन-आयु. प्रशांत चव्हाण सर.*🔹

