एरंडोल येथे १७० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

महाराष्ट्र
Share

एरंडोल येथे १७० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे एका अपंग व्यक्तीचे रक्तदान.

एरंडोल प्रतिनिधी(विज्ञान पाटील)
एरंडोल येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त, अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिरात रामलल्ला च्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्याचे निमित्त साधून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी-शाखा एरंडोल व माधवराव गोवळकर स्वयंसेवी रक्तकेंद्र -जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १७० रक्तदात्यांनी रक्तदान करून अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
विशेष हे की या रक्तदान शिबिरात गेल्या १२ वर्षांपासून ईश्वर ज्ञानेश्वर माळी हे पायाने अपंग असुन देखील दरवर्षी रक्तदान करीत असून या वर्षी देखील त्यांनी रक्तदान केले.रक्तदानासाठी माधववराव गोवळकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांचे सहकार्य लाभले. सदर संस्थेचे चेतन दुसाने, डॉ. मकरंद वैद्य, रामचंद्र पोतदार, मधुकर सैंदाणे, सुनील अनपट, श्रीकांत मुंडले, सचिन देवरे, उज्वला पाटील, उदय सोनवणे यांनी मदत केली. सदर शिबिरात पंकज काबरा, उल्हास लढ्ढा, राहुल तिवारी, नरेंद्र जयवीरसिंह पाटील, एरंडोलचे पोलीस निरीक्षक सतिश गोराडे, एसटी डेपो संचालक बागुल , किशोर मोराणकर, डॉ. संभाजीराजे पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. आर.बी.पाटील, डॉ. सुरेश पाटील, डॉ.मकरंद पिंगळे, जगदीश ठाकूर इत्यादिंनी भेटी दिल्या.सदर शिबीर यशस्वीते साठी विवेकानंद केंद्र एरंडोल चे कार्यकर्ते प्रा. जी.आर महाजन,नरेश डागा, प्रसाद दंडवते, आर.डी.पाटील,दिपक पाटील,मंगेश पाटील, राजेंद्र पाटील, संजय सुर्यवंशी, श्रेयस बडगुजर, निलेश पांंडे, संदिप महाजन, रविंद्र कुलकर्णी, महाले , जोशी , डॉ. नरेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत