विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही.
• एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला.
• तो ब्राह्मण म्हणाला, “ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी,कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. ‘मृतमांस’ खाणे हे वाईट आहे.’
• यावर भगवंतांनी उत्तर केले,, ‘तू म्हणतोस की, आपण पक्षांच्या मांसाची निवडक पक्काने खातो आणि मृतमासाला स्पर्श करत नाही. तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस?’
•”हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे,खोटे बोलणे, बनवट गोष्टी करणे,कपट, व्याविचार करणे ही सर्व मृतमांस भोजनानेच आहेत, मांस भोजन नव्हे.
• कामभोगाची लालसा खाण्याबाबत वखवख,अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत.
•कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे कौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्वशूद्र, कृपणता ही मृतमांस भोजने आहे, मांस भोजने नव्हते.
•राग, लच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व कुसंगती ही सर्व मृतमांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हेत.
*🔹( संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पान नं.३०५.)
*🔹 संकलन आयु प्रशांत चव्हाण सर.*🔹

