लोहारा शहरातील पाणीटंचाईमुळे सुरू असलेली शासकीय बाधकामे थांबवा

संपादक पंचशील वाळके

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

लोहारा शहरातील पाणीटंचाईमुळे सुरू असलेली शासकीय बाधकामे थांबवा

 

लोहारा:-       यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीला लोहारा शहवासीयांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पाणी टंचाई लक्षात घेता लोहारा शहरातील नगर पंचायत कडून कोटयावदी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या बांधकामाला त्वरित थांबवण्याची आदेश देण्यात यावेत अशी मागणी माजी नगर सेवक शाम नारायंकर यांनी गुरुवारी दि 29 जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये निवेनाद्वारे केली आहे , निवेदनात म्हटले की, लोहारा नगर पंचायत वतीने नगर पंचायत हदित नगर पंचायत चे नूतन इमारत बांधकाम व नाना नाही पार्क बाधकाम करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे या कामावर पाणी टंचाईमुळे कमी प्रमाणात पाणी मारले जात असल्याने कामाचा दर्जा खालावत असून निकृष्ट दर्जाचे कामे होत आहेत ,शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव ,नाले , बोअर आदी जलस्रोत बंद पडल्याने अशा परिस्तीत कामावरही कंत्राटदारा कडून कमी पाणी मारले जात आहे,त्यामुळे कामाची गुणवता ढासळणार आहे काही स्थानिक लोप्रतिनिधींनी सत्ताधारी हे कामे आटोपण्यासाठी धावपळ करीत असून कंत्राटदाराकडून बिले काढण्यासाठी सपाटा लावला जात आहे त्यामुळे पाणी टंचाई चा अनुष्काने होत असलेली दर्जाहीन कामे त्वरित थांबवा व्हीत व पाण्याचा साठा करून नागरिकांना पाणी उपब्धतेनुसार वेळेवर पुरवठा करावा असे निवेदनात म्हटले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत