भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म-पोस्ट नं.१६४. •पंचम खंड •  संघ आणि त्याची संघटना.

संपादक पंचशील वाळके जाहिराती व न्युज साठी आजच संपर्क साधा

धार्मिक बातमी
Share

 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म-पोस्ट नं.१६४.
•पंचम खंड •
 संघ आणि त्याची संघटना.

 

• भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे. भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक.
• संघ ही भिक्खूंची संघटना. उपासकांची संघटना नव्हती.
• बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्रजक असे. परिव्रजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे.
•प्राचीन परिव्रजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय.
• आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात याचे, त्यांनी प्रवचने ऐकाची आणि नीतीशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गुढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी. जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे.
•काही प्राचीन परिव्रजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहात.तर काही कुणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत.
• ह्या प्राचीन परिव्रजकांच्या वर्गात स्त्री-परिव्रजकही असत. त्याकाळी त्या कधी पुरुष परिव्रजकाबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहात.
• ह्या प्राचीन परिव्रजकांचा संघ नसे.वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येय ही त्यांच्यासमोर नसायचे.
• भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेविले.
*🔹( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पान नं.३१७.)*🔹
*🔹 संकलन-आयु. प्रशांत चव्हाण सर.*🔹

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत