एक घास काऊचा,एक घास चिऊचा
नागपुर : बालपण म्हणजे अनेक आठवणींचा जिवंत झराच जणू. नुसत बालपण म्हटल तरी आपल्याला आपले बालपण डोळ्यासमोर उभे रहाते. नुसती मस्ती,उनाडक्या व वेळ मिळाला तर अभ्यास. प्रत्येक घर हक्काचेच असायचे. कोणी मामा,मामी,काका,काकू व आजी आजोबा असायचेच. घट्ट नात्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बालपण व आपले शेजारीपाजारी.कोणाकडेही केंव्हाही जाता येता येत होते. मित्र जेवत असेल तर काकू आपल्यालाही जेव म्हणत होती.
सर्वात सुंदर आठवण म्हणजे एक घास काऊचा,एक घास चिऊचा. आठवते ती आई. पोटभर जेवल्यावर सुध्दा ताटातील उरलेले अन्न किती स्वाभाविकपणे व प्रेमाने आई आपल्याला भरवत होती. या भरवण्यात काऊ व चिऊ च
कसे आले असतील. बाकीचे बरेच पशुपक्षी होते पण मग काऊ चिऊच का. बहुधा हे दोन्ही पक्षी आपल्या सहवासात राहायची. चिऊच घर व पिलावळ आपल्याच घरात राहायची. काऊ मात्र बाहेरच झाडावर घरटे बांधून राहायचा.त्यांना आपल्या पिल्लांना भरवताना आपण नित्य नियमित पाहत असू. काऊला मात्र घरात प्रवेश न्हवता. पण काऊला पण महत्व होतेच. पाव्हणा येणार असल्यास कावळा काव काव करून आपल्याला सूचित करतो. पैल तो गे काऊ कोकताहे,शकुन ग माये सांगता आहे हे ज्ञानेश्वर माऊलीचे गीत आठवा.कावळा आपल्या सोबत शेवट पर्यंत असतो. परत या कावळ्यास ऊड ऊड रे काऊ तुझे सोन्याने मढविल पाऊ.कावळ्याला सोने पण चिमणीला का नाही असा प्रश्न आज पडतो. काऊ व चीउच्या घरट्यात सुध्दा फरक होता. अश्या आठवणी विसरुच शकत नाही.
असे काऊ व चिव आपल्या आयुष्यात लहानपणी येतात. काऊ चिऊ प्रमाणे आपला बालमित्र म्हणजे मोर. जो आपण कधीच परिसरात पाहिलेला नसतो तरी ओळख मात्र खूप जुनी असते. कसा काय मोरच घरात आला. इथे इथे बस रे मोरा, बाळा घाले चारा आपल्या सर्वांच्या आईने म्हटलेले गाणे. आईंचे लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला का ग बाई.कशी झोप लागायची हे कोडेच आहे.
आता मात्र काऊचिऊ व मोर या पिढी पासून खूपच दूर गेले आहेत.
आता काऊ चिऊ चा घास दिसत नाही.आता आधुनिक काऊ चिऊ आलेत,



