एरंडोल येथील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

महाराष्ट्र
Share

एरंडोल येथील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

 

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

 

 

एरंडोल – पंचायत समिती लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक निहाल तडवी यांना कामात व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच कामात अनियमितता दिसून आल्याने प्रभारी गटविकास अधिकारी विजय अहिरे यांनी निलंबित केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव हे एक महिन्यासाठी रजेवर गेले असल्याने प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजय अहिरे यांनी कनिष्ठ सहाय्यक निहाल तडवी हे वारंवार कामावरून अनाधिकृत गैरहजर राहत असत , आर्थिक कामकाजात अनियमितता व हलगर्जीपणा तसेच सोपवलेले काम वेळेवर न करणे या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचा अहवाल जिल्हा परिषद जळगाव येथे पाठवण्यात आलेला आहे. दरम्यान सदर कार्यालय तसेच तालुक्यातील अनेक कर्मचारी बाहेरगावावरून ये जा करत असताना वारंवार नागरिकांना सदर समस्यांना तोंड द्यावे लागते तरी नागरिकांमधून या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर देखील अशाच प्रकारे कारवाई करून नियमितता आणण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत