आमदार रत्नाकर गुट्टे मंत्री व्हावेत, श्रध्दास्थान मन्नाथ चरणी साकडे! गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले

महत्वाची बातमी
Share

आमदार रत्नाकर गुट्टे मंत्री व्हावेत,
श्रध्दास्थान मन्नाथ चरणी साकडे!

गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले

गंगाखेड : येत्या काही दिवसात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी त्यांच्या पत्नी रेखाताई गुट्टे आणि उपसभापती संभाजीराव पोले यांनी शहराजवळील मन्नाथ मंदिरात विधिवत पूजन करून श्री मन्नाथाच्या चरणी साकडे घालून महाआरती केली.

गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आ.डॉ.गुट्टे यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामांची चुणूक दाखवून दिली आहे. तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे. विशेषत: गेल्या ४० वर्षांचा ब्याकलॉग भरून काढला आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या दुरदृष्टी बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधीला मंत्री केल्यास विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपसभापती संभाजीराव पोले यांनी व्यक्त केला.

राज्यात यंदा महायुतीने दैदिप्यमान यश मिळवले आहे. परंतु, आमदार डॉ.गुट्टे यांनी अतिशय संकटाच्या काळात भाजपला मोलाची साथ दिली आहे. याची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. सध्या त्याचाच नेतृत्वात सरकार स्थापन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आमदार डॉ.गुट्टे यांच्या प्रामाणिकपणाला योग्य तो न्याय मिळेल. तसेच त्यांची मंत्रीपदी वर्णी निश्चित लागेल, असे सूतोवाच रेखाताई गुट्टे यांनी केले.‌

दरम्यान, रासप आमदार डॉ.गुट्टे हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी वेळोवेळी भाजपला विशेष मदत केली आहे. विधान परिषद आणि राज्य सभेच्या निर्णायक निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीची परतफेड मंत्रीपदाने केली जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.‌ परिणामी, आ.डॉ.गुट्टे यांच्या रूपाने‌ मतदारसंघाला पहिला मंत्री मिळेल का? याची मतदारसंघातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.‌

यावेळी रेखाताई रत्नाकर गुट्टे, उपसभापती संभाजी पोले, रामराजे फड, माजी सभापती मगर पोले, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मुंडे, सरपंच प्रल्हाद शिंदे, सरपंच गोविंद सानप, सरपंच प्रदीप शिंदे, सरपंच बबन गुट्टे, सरपंच प्रकाश नागरगोजे, सरपंच सुभाष पोले, संदीप वाळके, अंबादास राठोड, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, बाजार समिती संचालक मारोती साळवे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य पिराजी कांबळे, युवा नेते बाबा पोले, दिलीप फड, बळीराम घरजाळे, पप्पू घरजाळे, भागवत भेंडेकर, हनुमान देवकते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत