सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा…
बार्टीचे सहा.प्रकल्प व्यवस्थापक श्री अनिल वाळके यांनी केले नागरिकांना आव्हान
( बार्टी नागपूर तर्फे महिला हक्क जाणीव जागृत पर्वाचे आयोजन)
नागपूर :- समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण राबविण्यात येत असून या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मत महिला हक्क जाणीव जागृती पर्वाच्या निमित्ताने श्री अनिल वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.
समता बुद्ध विहार,नंदनवन,नागपूर येथे बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर व जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण नागपूर च्या संयुक्त विद्यमाने महिला हक्क जाणीव जागृती पर्वाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनिल वाळके,सहा.प्रकल्प व्यवस्थापक बार्टी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड.सुरेखा बोरकुटे,सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर व प्रमुख अतिथी म्हणून श्री मनीष बारापात्रे, सेवानिवृत्त खंड विकास अधिकारी व स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष श्री राजकुमार वंजारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व संविधान उद्देशपत्रिका वाचनाने करण्यात आली.बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी प्रकल्प अधिकारी श्री सलमान शेख यांनी माहिती प्रास्ताविक भाषणात विशद केली तर भारतीय संविधान व त्याचे महत्व प्रकल्प अधिकारी कु.शीतल गडलिंग यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा इतिहास व आजचे वर्तमान यावर प्रकल्प अधिकारी श्री तुषार सुर्यवंशी यांनी बार्ति च्या प्रशिक्शन व इतर योजना बबत महिति देउन बार्तिच्या काम्कजचि महिति आपले भाषणात सांगितली
श्रीमती सुरेखा बोरकुटे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले तर श्री मनिष बारापात्रे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी श्रीमती सरिता महाजन आभार श्री राजकुमार वंजारी यांनी केले.

