खेळाडू चिन्मय बोरफळेचा रणरागिणी ग्रुपच्या वतीने सत्कार
गंगाखेड प्रतिनिधी
देवराव (बाळासाहेब) जंगले
येथील भूमिपुत्र रायझिंग क्रिकेट अकॅडमीची खेळाडू चिन्मय बोरफळे हिने 20/20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे उपकर्णधार म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करून खेळून आल्याबद्दल रणरागिणी ग्रुपच्या वतीने चिन्मय सह मार्गदर्शक वेदांत महाजन यांचा मैदानावर भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा समिती प्रमुख शिक्षक नेते बाळासाहेब राखे हे होते रणरागिनी ग्रुपच्या डॉ.भाग्यश्री भरड, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सौ.वंदना आंबेकर,सौ.माया औसेकर सौ.पाठक, सौ.नीता भरड,सौ.सविता राखे,श्रद्धा बोरफळे, सौ.सीमा डोंगरकर रायझिंग क्रिकेट अकॅडमीचे कोच सोमनाथ मस्के यांच्यासह बाल खेळाडू उपस्थित होते

