तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्यासह जनतेसाठी सदैव तत्पर असेन आ.डॉ.गुट्टेंचा शब्द : प्रवेश सोहळा संपन्न

महाराष्ट्र
Share

तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्यासह जनतेसाठी सदैव तत्पर असेन

आ.डॉ.गुट्टेंचा शब्द : प्रवेश सोहळा संपन्न

गंगाखेड प्रतिनिधी
देवराव (बाळासाहेब)जंगले

मतदारसंघासह जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी योग्य ते उपक्रम राबवून त्यांना मदत करा. तसेच आपापल्या भागातील समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही केव्हाही हाक द्या, त्या ठिकाणी कायम तत्पर असेन. कारण, आपल्या सर्वांना मिळून विकासाचा पाया अधिक सक्षम करायचा आहे. त्यामुळे पदाधिकारी म्हणून जनसंपर्क वाढवा. उपक्रम राबवा. लोकहिताची कामे करा. जेष्ठ नागरिकांना सहकार्य करा. लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवा. निराधारांना आधार द्या. तुमच्या चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहीन, अशा शब्दात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.

तालुक्यातील मौजे.बनपिपळा येथील निवासस्थानी आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. पालमचे उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण, नगरसेवक माऊली घोरपडे, सैफ चाऊस, जालिंदर हत्तीआंबिरे, संजय थिटे, रशीद खान पठाण, सय्यद विखार, झिया पठाण, जबार भाई यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आ.गुट्टे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नेहमी लोकहिताची भूमिका घेऊन काम करा. जनतेची सेवा करताना प्रामाणिकपणा जपा. पारदर्शक आणि गतिमान कारभार करा, असाही सल्ला दिला.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, मित्र मंडळ पदाधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचे आपल्या कामातून सोने करा. ग्रामीण व शहरी भागातील विकासाला चालना देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम हाती घ्या. आपल्या चांगल्या कामांच्या पाठीशी कायम उभा राहीन. शेवटी, विकास आणि जनसेवा हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा योजना, कार्यक्रम आणि उपक्रम राबवा. तुमच्या कल्पना आणि योजनांचे नेहमी स्वागत केले जाईल. तसेच नेहमी लोकहिताची भूमिका घेऊन काम करा. जनतेची सेवा करताना प्रामाणिकपणा जपा. पारदर्शक आणि गतिमान कारभार करा, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर लांडगे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस, युवक जिल्हाध्यक्ष बालासाहेब ढोले, प्रथम नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, नगरसेवक उबेद खान पठाण, अजीम खान पठाण, शेख गौस, असदखान पठाण, गफार खुरेशी, गणेश हत्तीआंबिरे, शेख अकबर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत