ग्रामपंचायत खडसंगीमध्ये माहिती अधिकारांतर्गत १५ वा वित्त आयोगाच्या निधीची माहिती मागणी

E-Paper सामाजिक
Share

ग्रामपंचायत खडसंगी येथील जन माहिती अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधी संदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. अर्जदार पंचशील पंढरी वाळके यांनी ०६ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या अर्जामध्ये सन २०२० ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत प्राप्त झालेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी, त्याचा खर्च, मंजूर कामे तसेच संबंधित कागदपत्रांची माहिती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

अर्जात माहिती अधिकार अधिनियम, २००५ नुसार विहित कालावधीत माहिती देण्याची विनंती करण्यात आली असून, माहिती न दिल्यास अथवा अपूर्ण माहिती दिल्यास संबंधित कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत