नागपुर :- रविवार दि. 19/11/2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंद बुद्ध विहार विठ्ठलवाडी रोड उल्हासनगर, पश्चिम येथून ,देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यक्रमास आलेल्या भिक्खू संघाच्या उपस्तीती मध्ये सदर बुद्ध विहारात बुद्ध वंदना , पूजा पाठ करून ,बुद्ध भूमी फाउंडेशन चे प्रमुख भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली, भव्य धम्म रॅलीची सुरवात झाली.यावेळी कठीण चिवरदानोत्सव संयोजन समितीचे सर्व कार्यरत पदाधिकारी, नंदिनी साळवे, अर्जुन साळवे,इंजि. बिरजू जाधव, राजू रोकडे, राहुल वाघ, सुरेश कटारे,महानंदा खोब्रागडे, सविता शिरसाट, प्रियांका कदम,अनन्या मनथने, गणेश मोरे , नवीन गायकवाड, प्रा.महेंद्र दहिवले, विनय फुलपगार,रोहित खरात,उल्हास सपकाळे, यांनी मोठे परिश्रम घेतले,या रॅलीत महाराष्ट्र व अन्य राज्यातून आलेले आदरणीय भिक्खू , भिक्खू संघ उपस्तीत होते, धम्मरत्न महाथेरो, डॉ. राहुल बोधी महाथेरो (चेंबूर, मुंबई), विपश्यना चार्य संघकीर्ती महाथेरो, विनय बोधी महाथेरो(कासने वाशिंद मुंबई), डॉ. सम्यक बोधी महाथेरो (मध्यप्रदेश), भन्ते विमलतिस्स महाथेरो (श्रावस्ती), भन्ते प्रियरत्न, भन्ते प्रियदर्शी, भन्ते ब्रह्मरत्न , भन्ते यामरत्न भन्ते इंदरत्न, भन्ते विनयरत्न, भन्ते बोधीरत्न, भन्ते मोखरत्न, भन्ते नंदरत्न आणि भिक्खू संघ , कठीण चिवर दान दायक, दानदाते उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते , त्याच प्रमाणे, Consul General of srilanka Consulate General in Mumbai. Dr Valsan Vethody, Madam Anita Vethody, Madam Shivani Ariyarathne, Mr.Ajith pushpa kumara., Madam Shashiranga,. Mr. Chintha ka, Madam Sumithra, Mr. Umarkanth, Madam.Sheela, Mr.Subramanium,Mr.Kapil dev, Mr.Prakash , Mr. Dinesh.
या श्रीलंके हुन आलेल्या प्रमुख पाहुणे, आणि श्रीलंकेचे राजदूत यांच्या हस्ते सर्व भिक्खू ना कठीण चिवरदान करण्यात आले, ,धनश्री सोनवणे, शितल शिरसाट,गौरी जूनगडे, जरीन खान सय्यद, मानव साळवे,भावेश चव्हाण, साहिल जाधव, राजवणी, प्रशिक कटारे, प्राची जाधव या अशोक नगर, वालधुनी कल्याण, भीमकन्या लेझीम पथकाच्या मूला ,मुलींनी लेझीम चे सुंदर सादरी करण. करून रॅलीची शान वाढवली, या कार्यक्रमास उपस्थित उपासिका ,उपासक यांनी आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली . त्या बद्दल भन्ते गौतमरत्न महाथेरो यांनी सर्वांचे खूप खूप आभार मानले , मंगल मैत्रीची कामना केली .

