युवाशक्ती ग्रामविकास संगठन अमरावतीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर
प्रतिनिधी/अमरावती
दिनांक 1/12/2024 ला प्रमिलाई निवास जलाराम कॉलनी दस्तुर नगर येथे युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारीणीचे सचिव पुरुषोत्तम सदार, कोषाध्यक्ष रामेश्वर सुलताने, सदस्य सुधिर लाडझरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरूवात रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांशी चर्चा करून अमरावती जिल्हा संगठन कार्यकारिणी जाहीर केली.
अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद घाटे, जिल्हा संघटक पदी संतोष भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वप्निल चव्हाण व पवण पाटणकर, जिल्हा सचिव पदी देवेंद्र भोंडे, जिल्हा सहसचिव पदी आकाश शेंडे, जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी आनंद मेहरे, जिल्हा जनजागृती अभियान प्रमुख पदी विशाल गुल्हाणे, जिल्हा नियोजन प्रमुख पदी निलेश गजभिये,चांदुर बाजार तालुका अध्यक्ष पदी तुषार खडके यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण व मुख्य कार्यकारीणीच्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नवनियुक्त अमरावती जिल्हा संगठन पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रशांत साकरकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.

