पत्नीच्या बदनामीच्या भीतीने पतीने संपवले जीवन….!

महाराष्ट्र
Share

 

 

 

 

 

 

पत्नीच्या बदनामीच्या भीतीने पतीने संपवले जीवन….!

एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

एरंडोल :तालुक्यातील रंवजे येथील एका तरुणाने पत्नीच्या बदनामीच्या भीतीने गिरणा पाटचारित आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेस मित्र जबाबदार असल्याची सुसाईड नोट मृत्यूपूर्वी पतीने लिहून ठेवली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील रंवजे येथील सुनील हिरालाल जगताप (३३) याने आपल्या गावाजवळील गिरणा पाटचारित उडी घेत आपले जीवन यात्रा संपवली यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीत सुनील चा भाऊ अनिल मराठे यांनी सांगितले की ते दि.२० जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता कंपनीत कामाला गेलो होतो तेव्हा सुनीलच्या मित्राने तुझा लहान भाऊ याने गिरणा कॅनॉल पाट चारीमध्ये उडी घेतली आहे तू लवकर घरी ये असा फोन केला त्यानंतर सकाळी ७.०० वा. एरंडोल तालुक्यातील खर्ची शिवारातील अनिल नारायण महाजन यांच्या शेताजवळ गिरणा पाटचारित सुनील जगताप आढळून आला. त्याला खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले यानंतर कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी यांनी एकच टाहो फोडला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सुनील जगताप यांच्याकडे सुसाईड नोट सापडले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की मी सुनील आजपासून सर्वात त्याग करीत आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे आम्ही दोघेजण व्यवस्थित जीवन जगत होतो पण आमच्या दोघांमध्ये दिगंबर थोरात यांनी माझ्या बायकोवर नजर ठेवत होता आणि तिला धमकी देत होता तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे केले नाही तर मी तुला बदनाम करेल हे तिने मला सर्व काही सांगितले व मी ते ऐकून स्तब्ध झालो माझे होश उडाले आता मी काहीच करू शकत नाही त्यामुळे मी माझी जीवन यात्रा संपवतो. असे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार राजेश पाटील हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत