विचारातून समाज परिवर्तन करणे काळाची गरज  समाजसेविका प्रा. सुनीता हुमे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र
Share

विचारातून समाज परिवर्तन करणे काळाची गरज

 समाजसेविका प्रा. सुनीता हुमे यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- शिक्षण प्रणालीचा योग्य वापर करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्रांती घडविणे महत्त्वाचे आहे. विचारातून समाज परिवर्तन या शिवाय स्त्रियांमध्ये ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. समाजामध्ये सहकाऱ्यापेक्षा विरोधकच जास्त असतात. सध्या नागनाथ व सापनाग डोके वर काढत आहेत. समाज जपणारा नेता दिसत नाही. आम्हाला शिव, शाहू, फुले, आंबेडकर समजून घेण्यासाठी वाचायला पाहिजे. तेव्हाच समाज परिवर्तन करणे शक्य होईल. असे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुनीता हुमे यांनी आदर्श नगर व अशोक नगर लाखनी येथे २१ फेब्रुवारी रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती निमित्त रविवारी(ता.२१) रोजी मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले.
आदर्श नगर व अशोक नगर लाखनी येथे रविवारी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी भीम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता अशोक कठाने, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रा. सुनीता हुमे, विलास आगासे, मंगलमूर्ती किरणापुरे, सी.के. लेंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलनाने अभिवान सभेला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार जीवनात अंगिकारण्याचे उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मंगेश मेश्राम तर आभार पी.एल. वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमराम मेश्राम, आनंद दामले, डी.आर. मेश्राम, राजेश टेंभूर्णे, भोला भैसारे, पी.एम. मेश्राम, धनराज भालेराव, सतीश वासनिक, विलास जांभूळकर, डॉ. रेवाराम खोब्रागडे, दिलीप नागलवाडे, अशोक चेटूले, लोकेश गायधनी, भगवान बोकडे, उमेश रेहपाडे, नितीन भादाडे, डॉ. चांदेवार, डॉ. गाहाने, शरद गिदमारे यांनी विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत